Monday, February 9, 2015

अभिनेत्री राधिका आपटेचे कथित न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : आता पुन्हा एकदा सोशल मीडियामुळे सेलिब्रिटीची प्रायव्हसी धोक्यात आली आहे. ‘लय भारी’फेम मराठी अभिनेत्री राधिका आपटेचे कथित न्यूड फोटो सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत.



राधिका आपटे मराठीसह बॉलिवूड सिनेमांमधील नावाजलेली अभिनेत्री आहे. नुकतेच तिने अभिनेता रितेश देशमुखसह लय भारी या सिनेमामध्ये काम केले आहे. याआधी तुषार कपूरसह ‘शोर इन द सिटी’मध्येही अभिनय केला आहे. शिवाय आगामी ‘बदलापूर’ आणि ‘हंटर’ या सिनेमांमध्येही राधिका आपटे दिसणार आहे.



सिनेजगतातील सिनेतारकांचे न्यूड फोटो किंवा एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी अभिनेत्री मोना सिंगचा एमएमएस व्हायरल झाल्याची घटना घडली होती.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो मॉर्फ केलेले असून, ते माझे फोटो नाहीत, असे अभिनेत्री राधिका आपटेने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment