Monday, February 9, 2015

‘या, माझ्यावर बलात्कार करा’, तरुणीचं खुलं आवाहन


संपूर्ण देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. अगदी तीन महिन्याच्या चिमुरडीपासून 90 वर्षांच्या स्त्रीवरही बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

मानवतेला कलंक लावणाऱ्या या घटना दिवसेंवदिवस वाढत आहेत. बलात्कार करणाऱ्यांमध्ये मानवतेचा अंशही नसतो. बस, ट्रेन, रिक्षा किंवा रस्त्यावरुन जाणाऱ्या स्त्रीकडे नेहमीच कामवासनेने पाहिले जाते. दुर्दैवाने आपला समाजही या घटनांविरोधात म्हणावा तितका जागरुक दिसत नाही.

समाजाच्या याच बेफिकीरीवर आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांच्या विरोधात आवाज उठवला आहे माधुरी देसाई या तरुणीने. ‘आओ, मेरा रेप करो’ असे उपरोधिक आवाहन माधुरी देसाई हिने एका व्हिडिओतून केले आहे.


अभिनेत्री राधिका आपटेचे कथित न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : आता पुन्हा एकदा सोशल मीडियामुळे सेलिब्रिटीची प्रायव्हसी धोक्यात आली आहे. ‘लय भारी’फेम मराठी अभिनेत्री राधिका आपटेचे कथित न्यूड फोटो सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत.



राधिका आपटे मराठीसह बॉलिवूड सिनेमांमधील नावाजलेली अभिनेत्री आहे. नुकतेच तिने अभिनेता रितेश देशमुखसह लय भारी या सिनेमामध्ये काम केले आहे. याआधी तुषार कपूरसह ‘शोर इन द सिटी’मध्येही अभिनय केला आहे. शिवाय आगामी ‘बदलापूर’ आणि ‘हंटर’ या सिनेमांमध्येही राधिका आपटे दिसणार आहे.



सिनेजगतातील सिनेतारकांचे न्यूड फोटो किंवा एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी अभिनेत्री मोना सिंगचा एमएमएस व्हायरल झाल्याची घटना घडली होती.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो मॉर्फ केलेले असून, ते माझे फोटो नाहीत, असे अभिनेत्री राधिका आपटेने स्पष्ट केले आहे.