कल्पना करा, तुम्ही
संध्याकाळी ऑफिसातून बाहेर पडलाय... घरी जाण्यासाठी घाईघाईत लोकल पकडलीय...
जागा मिळालीय आणि तुम्ही रिलॅक्स झालाय... पण गाडीनं अर्धं अंतर कापल्यावर
तुम्हाला समजतं की तुमच्या लोकलची सुरक्षा ज्याच्या हातात आहे तो लोकल
गार्ड दारू पिऊन तर्रर्र आहे तर...
हादरलात ना? नुसत्या कल्पनेनंही अंगावर काटा आणणारी ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. सीएसटीहून सुटणाऱ्या टिटवाळा गाडीतील प्रवाशांनी शनिवारी हा थरारक अनुभव घेतला. त्याचे झाले असे...
सीएसटीहून टिटवाळ्याकडे चाललेली लोकल ८.४४ वाजता डोंबिवली स्थानकात पोहोचली. तिथून निघत असताना अचानक गाडी पुन्हा थांबली. गाडी अचानक थांबल्यामुळं मोटरमननं गार्डच्या केबिनला सिग्नल देऊन विचारपूस केली आणि गाडी सोडण्याची परवानगी मागितली. मात्र, गार्डच्या केबिनमधून कुठलाही प्रतिसाद आला नाही. काहीतरी गडबड असल्याचे ओळखून मोटरमनने हॉर्न वाजवून स्टेशन मास्तरच्या कार्यालयाला सूचना दिली.
मोटरमनकडून अलार्म येताच कुणीतरी साखळी ओढली असावी असं समजून स्टेशनवरील अधिकाऱ्यांनी प्रत्येक डबा तपासण्यास सुरुवात केली. मात्र, काहीच आढळून आलं नाही. अखेर अधिकारी गार्डच्या केबिनमध्ये पोहोचले. तिथे पाहतात तो ड्युटीवर असलेले लोकल गार्ड नामदेव सुतके समोरच्या डेस्कवर मान टाकून झोपले होते आणि त्यांचे दोन्ही पाय इमर्जन्सी ब्रेकवर होते.
नेमकं काय झालं आहे याची माहिती सुरक्षा अधिकारी घेत असतानाच प्रवाशांचा जत्था केबिनजवळ येऊन थडकला. गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी सुतके यांना सुरक्षेच्या गराड्यात स्टेशन मास्तर कार्यालयाकडे नेलं आणि गाडी सुरू झाली.
या घटनेनंतर सुतके यांना कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. त्यांचा वैद्यकीय अहवाल अद्याप यायचा आहे. मात्र, रेल्वे पोलीस दलाच्या एका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुतके यांच्या तोंडाला दारूचा वास येत होता. ते दारू प्यायले होते. रेल्वेच्या नियमानुसार, गाडी सुरू करण्यापूर्वी मोटरमन आणि गार्ड नशेत आहे की नाही याची तपासणी केली जाते. त्यामुळं सुतके यांनी गाडीत बसल्यानंतर दारू घेतली असावी, असाही अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, सुतके यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

No comments:
Post a Comment